Ad will apear here
Next
‘जागतिक महिला दिन हा आत्मचिंतनाचा दिवस’
डॉ. अश्विनी धोंगडे यांचे मत


पुणे : ‘जागतिक महिला दिन हा महिलांनी स्वतःविषयी आणि स्वतःच्या परिस्थितीविषयी गांभीर्याने विचार करण्याचा दिवस आहे. आज महिला दिनाच्या सोशल मीडियावर पावसासारख्या शुभेच्छा पडत आहे. शुभेच्छा देऊन जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे त्यांना वाटते ही अतिशय चिंतनीय बाब आहे. जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा दिवस नाही, तर तो आत्मचिंतनाचा दिवस आहे,’ असे मत डॉ. अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने (मसाप) जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्री एक ‘अ’क्षर ओळख’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, मंजुषा उकिडवे, मृणाल धोंगडे आणि राधिका जाधव उपस्थित होत्या.

डॉ. धोंगडे म्हणाल्या, ‘महिला आजही भेदभाव करताना आपल्याला दिसतात. काळ्या महिला, गोऱ्या महिला, सुशिक्षित महिला, गावंढळ महिला, श्रीमंत महिला, गरीब महिला अशा प्रकारचे भेदभाव आजही आपल्या समाजात पाहायला मिळत आहे. ही अत्यंत चिंतनीय बाब आहे. ज्यासाठी युनोने जागतिक महिला दिन सुरू केला, त्यापासून आपण दूर जात आहोत. जागतिक महिला दिनाला इव्हेंटचे स्वरूप आले आहे. आपल्यातील संवेदना हरवत चालली आहे.’

पवार म्हणाल्या, ‘‘मसाप’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवणारा आहे. माणूस म्हणून स्त्रियांना बरोबरीचा सन्मान प्राप्त झाला पाहिजे. आजही स्त्रियांना उंबरा ओलांडताना रोषाला सामोरे जावे लागत आहे. स्त्रियांच्या छोट्या छोट्या इच्छांना आजही पायदळी तुडवले जात आहे. जागतिक महिला दिन साजरा होत असतानाही आजही स्त्रीला असुरक्षितच वाटत आहे.’



मंजुषा उकिडवे, मृणाल धोंगडे आणि राधिका जाधव यांनी ‘स्त्री एक ‘अ’क्षर ओळख’ या कार्यक्रमात आरती प्रभूंची ‘तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी’, विंदा करंदीकरांची ‘कर कर करा  मर मर मरा’, मृणाल पांडे यांची ‘दररोज कोंबडा आरवायच्या आधी’, तेलगू कवयित्री निर्मला प्रांत यांची ‘माझी आई सम्राज्ञी आहे’, अश्विनी धोंगडे यांची ‘थोडी इथे थोडी तिथे’, इंदिरा संत यांची ‘एकटी’, सुरेश भट यांची ‘मी एकटीच’ ही गझल, तसेच स्पृहा जोशी यांची ‘तुम्ही मला शांत बसायला सांगता’ अशा अनेक कवितांमधून स्त्रीचा एक चेहरा, काहीशी पारंपरिक आणि काहीशी आधुनिक अशी तिची ओळख, स्त्री नेमकी आहे कशी, तिची ‘अ’क्षर ओळख, ती अक्षरातून कशी व्यक्त झाली, त्या ओळखीचे विविध कंगोरे कोणते, याचा परिचय मंजुषा उकिडवे, मृणाल धोंगडे आणि राधिका जाधव यांनी कविता आणि गीतांच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडून दाखविला.

पवार यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह दीपक करंदीकर, शहर प्रतिनिधी डॉ. अरविंद संगमनेरकर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZPABY
Similar Posts
साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज पुणे : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली ११० वर्षे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या या संस्थेचा १११वा वर्धापनदिन २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ग्रंथ आणि
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी
‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ पुणे : ‘गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल्याण निधीसाठी पुण्यात एका कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते
‘लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखन कार्यशाळा उपयुक्त’ पुणे : ‘लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणिवांची, अनुभवांची बेरीज करीत नाही तोपर्यंत सकस साहित्यकृती निर्माण होणार नाहीत. लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language